आम्हाला शाप स्वकियांचा, अरे आता पर्यंत आम्ही परकीय आक्रमणे थोपवून लावली पण आमच्या रक्तामासाच्या माणसांची आक्रमणे परतवून लावताना आमची माती रडली आमची धरती रडली, रक्ताचे थेंब मातीत मुरताना घुसमटून रडले।।
स्वराज्याची शपथ घेतल्या नंतर महाराजांच्या पुढे सगळ्यात मोठी आवाहने होती ती जवळच्या स्वकियांची म्हणजे जावळीचे मोरे, मावळचे बांदल, जे आदिलशाहीची मोठी सरदार घराणी ।।
कालांतराने बांदल स्वराज्यात आले आणि त्यांनी स्वराज्य साठी आपले रक्त अर्पण केले पण जावळीच्या जंगलातील काळा साप मात्र आपल्या कुरगोड्या करायचा थांबत न्हवता त्याचा बंदोबस्त करण हे खूप महत्त्वाचं झालं होतं ।। महाराजांनी खूप सामोपचाराने घेऊन सुद्धा चंद्रराव मोरे काय गप बसत न्हवता शेवटी राज्यांनी त्याचा बंदोबस्त करायचा ठरवलं आणि जवळीवर स्वारी केली मात्र ह्या जंगलाच्या सापाचा खात्मा करत असताना राज्यांना ह्या सापाच्या गळ्यातला एक हिरा मिळाला ।।
महाराजांनी स्वारी केल्या नंतर जावळीच्या जंगलात एकच तलवार अविरात्र चालली होती आणि ती तलवार qहोती त्या हिऱ्याची म्हणजे मुरार बाजी ह्यांची।।
त्यांची ती युद्ध कौशलता बघून महाराज धन्य झाले ।।
बांदल ह्यांच्या कडून लढलेले बाजी प्रभू देशपांडे, मोरे ह्यांच्या कडून लढलेले मुरार बाजी हे दोघेही सरदारकीची स्वामी निष्ठा पायाशी बांधून ते लढत होते आदीलशाही कडून।।
जावळीचा पाडाव करून महाराजांनी मुरारबाजी ह्यांना स्वराज्यात सामील करून घेतले आणि सासवड च्या पुरंदरचे किल्लेदार बनवले।।
मुरारबाजी तसे मूळचे महाड तालुक्यातले किंजळोली गावचे।।
शिव कार्यासाठी उरलेले आयुष्य समर्पित करायचे हेच उद्धिष्ट समोर ठेवून त्यांनी पुरंदरची जबाबदारी स्वीकारली ।। शिवरायांचे दक्खन मधले वाढते वर्चस्व औरंजेबाला पचत न्हवते, ह्या वेळी मात्र त्याने आपले सर्वात विश्वासू सरदार नावाने राजपूत पण मनाने मुघल असलेले मिर्झा जयसिंग ह्यास पाठवले आणि त्याच्या बरोबर भरपूर सैन्य दिल।। जयसिंग ह्यांच्या बरोबर आणखी एक क्रूर सरदार होता त्याच नाव दिलेरखान अतिशय क्रूर आणि युद्ध निपुण असा हा पठाण ।।
दक्खन मध्ये येताच त्याने लक्ष केला तो भिमासारखा अभेद असलेला पुरंदर किल्ला ।। पण त्याला ठाऊक कुठं व्हत किल्लावर कर्णसारखा तेजस्वी हिरा किल्ल्याची हिफाजत करायला बसला होता तो ।।।
पठाणाने सुरुवात केली ती गडाला वेडा देऊन पण त्याच्या हे लक्षात आलं की गड हा खूप पोलादी आहे एवढं शक्य नाही तो लगेच काबीज करण ।।
पुरंदर घ्यायचा असेल तर आधी वज्रगड ताब्यात येणे अतिशय आवश्यक आहे हे त्या मुत्सद्दी सेनानीने ओळखले नसेल तरच नवल. वज्रगड हा पुरंदरचा शेजारी पण पुरंदरची ताकत, दिलेरखानाने कपिलधारेच्या बाजुने वज्रगडावर तीन तोफा चढवण्यास सुरुवात त्यावेळी वज्रगडाचे किल्लेदार यशवंत बुवाजी प्रभू आणि त्यांचे बंधू बाबाजी बुवाजी प्रभू यांनी अवघ्या तीनशे मावळ्यांच्या मदतीने दिलेरखानाला निकराची लढत दिली. १५ दिवस जिवाच्या आकांताने किल्ला झुंजवला, पण दिलेरखानांच्या तोफांच्या मार्यापुढे गडाचा वायव्य बुरूज ढासळला आणि गड दिलेरखानाच्या ताब्यात गेला. मुघलांच्या लांबपल्ल्याच्या तोफांपुढे पुरंदरची शक्ती असलेला वज्रगड पडला. आता वेळ पुरंदरची!
वज्रगड पडणे म्हणजे पुरंदरच्या भक्कमतेला लागलेला टिकाव, पण मुरारबाजी हार मानतील तर सरदार कसले ।।
दिवस उजाडला 16 मे 1665, पुरंदरच्या इतिहासाची साक्ष देणारा दिवस ।। दिलेरखान आपल्या सैन्यासह पुढची रणनीती आखत असताना त्याच्या मनात किंचितही विचार आला नसावा की सातशे मावळे गडावरून येतील आणि पाच हजार पठाणांमध्ये घुसून कापायला सुरुवात करतील आणि हीच रणनीती आखली होती मुरार बाजींनी ।। अस केलं नायतर पुरंदर कधीही मुघलांच्या हातात जाईल हे मुरारबाजी जाणून होते म्हणून त्यांनी स्वतःहून गडा बाहेर पडून दिलेरखानाला सामोरे जायचे ठरवले आणि अखेर ती वेळ आली ।। सातशे मावळे घेऊन हर हर महादेव च्या घोषणा देत मुरारबाजी घुसले ते सरळ दिलेरखानाच्या मोगली कळपात आणि एकच रणकल्लोळ मजला, स्वामिनिष्ठ तलवार काशी चालते हे पहिल्यांदा दिलेरखानाने बघितले असावे कदाचित त्याच्या नेत्रांचे पारणे फिटले असावे।।
तो मुरार तांडव बघून दिलेरखान अचंबित झाला, खुश झाला स्वतःचे पठाण कापले जात असून सुद्धा त्याने स्वतःहून मुघली उंदरांना मुरार बाजीं पासून माग घेतले आणि मोठ्या आवाजात बोलला;
" है अल्लाह के भेजे हुये बंदे, कोण है तू, तू हमारी खिदमत मे आजा, अल्लाह के पनाह मे आ हंम तुम्हारी शान रखेंगे"
हे उद्गार ऐकून मुरार बाजी आणखीनच चिडले आणि रोषाने दिलेरखानं कडे जात बोलले "अरे तू काय आम्हाला फितुरी शिकवतो, तुझा कौल म्हणजे काय? मी शिवाजी महाराजांचा शिपाई तुझा कौल घेतो की काय "
आणि परत एकदा तुफान युद्ध पेटले, त्यांनी खानवर वार केला पण तो चुकला आता मुरारबाजी आपल्याकडं आलाय हे पाहून खानानं धनुष्य हाती घेतला आणि धनुष्याचा दोर कानापर्यंत खेचून मुरार बाजींच्या कंठाचा वेध घेतला आणि एक स्वराज्याचा शिरपेचातला आणखी एक तुरा खाली गळून पडला ।।।
बाजी खाली पडलेले पाहून खान कळवळला आणि बोलला; " ऐसा सिपाही खुदा ने पैदा किया "
"कसले हे धाडस, कसली ही स्वामी निष्ठा, अरे सातशे मावळ्यांमध्ये बारा बलुतेदार, अठरा पगड जाती आणि अनेक जाती धर्माची माणसे लढली त्यावेळी त्यांना विचारल असत ना की तुमची जात कुठली आणि धर्म कुठला तर कदाचित एकच उत्तर मिळालं असत, स्वराज्य आमचा धर्म आणि महाराज आमची जात"
।।।। स्वराज्य धर्मासाठी स्वतःचे रक्त अर्पण करणाऱ्या त्या प्रत्येक मावळ्याला माझा मनाचा आणि मानाचा त्रिवार मुजरा ।।।।
।।। हर हर महादेव ।।।

Jay Shivray⛳
ReplyDeleteChatrapati Shivaji Maharaj ki Jay..
ReplyDeleteMast......jay shivray
ReplyDeleteKhup chan, ajun khup lihishil ashi apeksha!👌
ReplyDeleteHar Har Mahadev🙏🙏
ReplyDeleteKhup chan 👌👌ekdam ladhai cha maiden dolya samor u ha rahila
ReplyDeleteHar har Mahadev🚩🚩
ReplyDeleteNice
ReplyDeleteMast
ReplyDeleteइतिहास जागा झाला, आपल्या हातून अशीच जनजागृती व्हावी हीच इच्छा
ReplyDelete👍🏻
ReplyDelete🚩
ReplyDeleteJay Maharashtra
ReplyDeleteHar Har Mahadev.. 🚩🚩
ReplyDeleteजय शिवराय ....!
ReplyDeleteWowww .. picturesed hot ahe dolyasamor wachatana
ReplyDeleteKhup chaan.. 👌👌👌
Ek number💯💯💯
ReplyDeleteWaaahh Mitra 🙏🏻🙏🏻🙏🏻
ReplyDeleteMastach bhava 🙏❤️💯
ReplyDeleteVery well written.....continue uploading new posts
ReplyDeleteअप्रतिम👌👌👌
ReplyDelete👌👌👌👍👍
ReplyDeleteAmazing!!! Keep writting.
ReplyDeleteMast lihlay...ekdam zakas...Jay bhavani Jay Shivaji..we are the average of five whome we spend most of our time.. Shivaji Maharaj Midas touch hote jyani te olakhal tyanch ayushy son zal
ReplyDelete