स्वराज्य स्थापनेच स्वप्न हे राजमाता जिजाऊ आणि थोरले राज ह्यांनीच बांधले होते कदाचित पोटात असताना छत्रपतींनी ते आत्मसात केले असावे।। आदिलशाहीची सरदारकी करत असताना बंगलोर हुन थोरल्या राजांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली होती आणि ह्याचा पाठ पुरावा म्हणून त्यांनी काही विश्वासू माणसे जिजाऊ ह्यांच्या सोबत पुण्याला पाठवलेली त्यात दादोजी कोंडदेव, दादोजी कंक, बाजी पासलकर।। अश्याच काही ठराविक आणि विश्वासू लोकांमूळ स्वराज्याच्या पाया भरणीचा नारळ फुटला।।
महाराज ह्या लोकांच्या कडून राजनीती, समाजकारणाचे धडे घेऊ लागले।
शेवटी स्वराज्य स्थापनेची आन घेन्याचा दिवस ठरला आणि रायरेश्वरच्या मंदिरात काही ठराविक मावळ्यांनिशी राजे पोहचले हे सौभाग्य लाभलं तानाजी मालुसरे, दादोजी कोंडदेव, बाजी पासलकर, झुंझारराव मरळ, कान्होजी जेधे, येसाजी कंक।।। ह्या मधले बहुतेक जन वेगळ्या वेगळ्या जातीचे होते पण त्याच्यात एकाच जातीच रक्त होते आणि ते म्हणजे स्वामी निष्ठा स्वराज्याप्रति आणि महाराजांप्रति।।।।
आणि ह्या दिवसा पासून ह्यातला प्रत्येक बहाद्दर हा मुघल, आदिल, निझाम ह्यांना नडतच राहिला अखेरच्या श्वासापर्यंत निधड्या छातीन परिणामांची फिकीर न करता।।।
जेव्हा अफझल खान चालून आला त्यावेळी त्याच्या खात्मा करून गणिमानां कस कापून काढायचं ह्याच जेवढ काय ठरलं त्यात एक नाव मात्र प्रकर्षानं घ्याव वाटत ते म्हणजे येसाजी कंक।।।
आता येसाजी कंक म्हंटल की ते महाराजांचे बाल मित्र मूळचे कोकणातले कोळी समाजातील।।। त्यांचा जन्म भुतोंडे गावी राजगड नजदिक चा।।
अंगा पिंडाने पिळदार, सात फूट उंच असा धिप्पाड मावळा कुणाच्या नुसता पुढे उभा राहिला तरी धडकी भरावी असे हे येसाजी राजांची सावली बनून कायम राहिले।
अफझल खानाचा कोथळा बाहेर काढला आणि टोफेंच्या गडगडाट आपले जे मावळे खानच्या छावणीत तुटून पडले त्यात येसाजी ही होते।।। हर हर महादेव च्या घोषणा देत त्यांनी जी त्रेदा तिरपिट उडवली ते काही विचारू नका अश्याच प्रकारे त्यांनी तोरणा, राजगड इथं झालेल्या लढाया ही लढल्या आणि जिंकल्या।।
त्यांचा हा प्रराक्रम नक्कीच राजांनी लक्षात ठेवला होता आणि त्यांना माहीत होतं की हा बुद्धिबळाच्या खेळातला वजीर आहे म्हणून।।
1976 मध्ये राज्यभिषेका नंतर राजेंनी आदिल शाहीला धारेवर धरले आणि त्या साठी त्यांनी हैदराबाद चा कुतुबशाह तानाशह शी हात मिळवणी केली आणि आदिलशाहीला धडा शिकवण्यासाठी राजे स्वतः मोहिमे वर निघाले।।
राज्यांबरोबर सरनोबत हंबीरराव मोहिते, सूर्याजी मालुसरे, दत्ताजी त्रेम्बक, प्रल्हाद पंत, सोनाजी नाईक, बालाजी ढमढेरे, मानाजी मोरे, सर्जेराव जेधे आणि येसाजी कंक अशी विश्वासू अनि भक्कम माणसे होती ह्यांची नुसती नाव जरी ऐकली तरी कसा अंगावर काटा उभा राहतो आणि मनाच्या कोपऱ्यात कुठंतरी हर हर महादेव अशी गर्जना प्रकट होते।।।
महाराज आणि मावळे निम्म्या वाटेत असताना महाराजांची पालखी अचानक थांबली, महाराजांनी विचारला काय झालं का थांबवली पालखी ??? पालखी स्वार पळत आला आणि बोलला "राज स्वतः कुतुबशहा तुमच्या स्वागताला आले आहेत" ह्याला म्हणत्यात रुबाब, वचप आणि कर्तृत्व।। राजे पटकन पालखी तुन बाहेर आले आणि राज्यांनी कुतुबशहा ला आलिंगन दिल। कुतुबशहा स्वतः जातीन स्वागताला येन ही खूप मोठी बाब।
भेटी गाठी स्वागता नंतर सगळे महालात पोहचले पण कुठं तरी कुतुबशहा ला मनात भिडसावत होते की सिवाजी के पास इतनि सारी फोज है लेकिन एक भी हाती क्यूँ नही है आणि त्याने शेवटी महाराजांना प्रश्न विचारलाच; राजाजी आपले पास इको बडी फोज है लेकीन एक भी हाती क्यूँ नही? ह्यावर महाराज सौम्य गालात हसून हमारे पास सभी के सभी हाती ही है इसलीये हमे हाती की जरूरत पडती हमारा हर एक आदमी सौ हातीओंके बराबर है।। ह्यावर कुतुबशहा आश्चर्यचकित झाला बावचाळला आणि बोलला अच्छा तो फिर हमारे फोज का हाती और आपला कोई भी सरदार मे जंग होनी चाहीये, देखते है कोण जितता है।।।
महाराजांनी होकारात्मक मान हलवून सांगितलं चुन लिजीए आप किसिको को भी, कुतुबशहा ने नजर फिरवली आणि त्याची नजर थांबली ती येसाजी कंक ह्यांच्या वर मग क्षणाचाही विलंब न करता कंक तयार झाले।।।
पण हे सगळं होत असताना महाराजांच्या चेहऱ्यावर समाधान होत, चेहऱ्यावर कुठंही चिंता न्हवती त्यांना माहीत होती येसाजी कुठल्याही हत्ती ला पाणी पाजल्या शिवाय शांत नाही बसणार।।।
युद्धाचा दिवस ठरला आणि पंचवीस हाबशे माजलेल्या हत्ती ला घेऊन रणांगणात आले, येसाजी पण तयारीत होते त्यांनी राज्यांचा आशीर्वाद घेतला आणि नजरेतून सांगितलं आता जातो आणि लगेच माघारी येतो पण परत येताना तुमचा मान घेऊन येतो।।।
आणि तो क्षण आला आणि माजलेला हत्ती आणि महाराजांचा ऐरावत भिडले। हा एवढासा माणूस माझं काय करणार ज्या माजात हत्तीण कंकांवर पहिला हल्ला केला आणि ह्याची अपेक्षा येसाजींना होतीच त्यांनी तो चुकवला।। कुतुबशहा ला तर हे काय चाललंय ह्यावर विश्वासच बसत न्हवता तो फक्त अचंबित होऊन बघत होता।।। इकडे येसाजी फक्त हत्तीला हूल देत होते तसा तसा तो हत्ती आणखीनच चवताळून त्यांच्या वर चालून येत होता, थोडा वेळ हे सुरू होत, थोड्या वेळात तो हत्ती थकला आणि हेच येसजींना पाहिजे होते त्यांनी सरळ जाऊन त्या माजलेल्याला धडक दिली हत्ती दबकला, दचकला, भीतरला करण त्याला धडक दिली होती चटणी भाकर खाल्लेल्या, मातीत वाढलेल्या, इमानाची चादर ओढलेल्या सह्याद्रीच्या वाघाने।।।
पाहिजे होतो तिथं हा थरार बघायला जीवन पावन झालं असत काय होती ती मानस।।।
पण अचानक त्या माजलेल्यानं स्वत:ला सावरत येसाजींना सोंडीत पकडले।। येसाजी हार मानतील ते कसले? त्यांनी आपली सर्व ताकद पणाला लावून हत्तीच्या सोंडेतून स्वत:ची सुटका करून घेतली आणि तलवारीचा थेट वार हत्तीच्या सोंडेवर केला।। बघणाऱ्यांना स्वत:च्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता तो वार ठरला निर्णायक कारण तो वार एवढा जबरदस्त होता की हत्तीचा सगळा माज उतरला आणि हत्ती सरळ युद्धभूमी तुन पळून गेला।। हा विजय साफ येसाजी नामक वादळाचा आणि हे निस्वार्थी वादळ उठले होत फक्त आपल्या रयतेच्या राजा साठी।।।
तिथं बघण्यार्यांचे फक्त एवढंच होत तो आला तो भिडला, नडला आणि जिंकला कोण होता तो कोण होता।।। ते फक्त कुतुबशाही साठी एक इशारा होता की आम्ही हत्ती पाळत नाही फक्त वेळ आल्यावर आम्ही हत्ती सारख होयला घाबरत नाही।।।
हा सगळा प्रसंग बघताना महाराजांची छाती अभिमानाने भरून अली।।। मला फक्त एवढं वाटतय त्या प्रसंगी जर इंद्र देव असताना तरी तो ऐरावातला बोलला असता थांब बाबा तू नको लढू त्या येसाजीशी कारण त्याची स्वामी निष्ठा एवढी मोठी की तो तुला पाणी पाजल।।
संधीच सोन केलं एसाजींनी आणि इतिहासाच्या पानावर आपली स्वामी निष्ठा सिद्ध केली अश्याच एक मर्द मावळ्याला आमचा मनाचा आणि मानाचा मुजरा।।।
।।। धन्य जाहलो आम्ही जन्मलो ह्या रांगड्या मातीत ।।।