Friday, 21 July 2023

||| स्वराज्य भक्ती- हिरोजी इंदलकर |||



जिजाऊंच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या, आई भवानीच्या आशीर्वादाने आणि सह्याद्रीच्या हिरव्या रांगोळीने नटलेल्या अश्या ह्या  माझ्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी राजांसारखा राजा लाभला हेय आमचं थोर भाग्य आणि गर्व।। 
आज खूप गप्पा झाल्या मित्र मंडळींन बरोबर आणि आतल्या मनात खूप वाटत होतं काही तरी लिहावं पण उमजत न्हवत नंतर विचार केला स्वराज्यावर भक्ती केलेल्या अशाच एका जिगरबाज मर्दाबद्दल ।  माझ्या शिवाजी राजा बद्दल खूप लिहिलं आजवर सगळ्यांनी पण आज वाटलं थोडस लिहावं त्यांच्या एका अशा मावळ्या बद्दल ज्याने कधीही कुठलीही अपेक्षा धरली नाही।।। तस बोललो तर महाराजांचा कुठलाच मावळा कधी आस धरून बसत न्हवता।। 
इराक, इराण मधून सिद्धी यायचेे आणि आपल्या माय माऊलिंना पवळून न्यायचे हे जेव्हा महाराजांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी ह्या सिद्धींचा बंदोबस्त करायचा ठरवला परंतु एक गोष्ठ त्यांच्या लक्षात आली आणि ती म्हणजे आपल्या सखोल कोकणात पसरलेल्या उत्तुंग सागराला आच लागली होती ती म्हणजे एक सागरी बांधवांची म्हणजे एक सागरी दुर्गाची।।। 
महाराजांना एका बेटाची गरज होती आणि ती उमगली एक मर्द मावल्याला म्हणजे हिरोजी इंदलकर ह्यांना।। 
हिरोजी इंदलकर म्हणजे महाराजांचे कट्टर अभियंते।। मालवण च्या किनाऱ्यावर एक सागरी दुर्गाची उभारणी करायची हे पक्के करून आणि ती कामगिरी हिरोंजीवर सोपवून महाराज राजगडाला गेले।। त्या नंतर महाराजांना आग्र्याला जावं लागलं आणि इकडे मालवण च्या दुर्गाचं काम अतिशय जोरात सुरू झालंं। 
महाराज आग्र्याला अडकले असताना आपण गढ बांधताना लागणारी आर्थिक मदत कशी वापरावी ह्याचे नियोजन हिरोजींनी कसे केले असावे त्यांनाच माहीत।। महाराजांनी दिलेली आर्थिक शिदोरी कधी संपली हे त्यांना सुद्धा कळले नाही।। काम बंद होऊ नये म्हणून हिरोजींनी गावाकडील जमीन घर हे सुद्धा विकले आणि गढ उभा केला डोळयांत फक्त एकच स्वप्न होत गढ उभारण्याच आणि माजलेल्या सिद्दीला रोखण्याच।।। 
मालवण च्या बेटावर उभा राहत होता तो सिंधुदुर्ग।।। माझ्या राजाला आवडेल का हा एकच प्रश्न हिरोजींच्या डोक्यात पडत होता।।।  महाराज आग्र्याहून सुखरूप सुटून आले आणि मोघल बादशहाच्या तोंडातून घास पळवून आणला। महाराज मालवण ला पोहोचल्यावर पश्चिम दिशेला उभा होता माझ्या माय मावलीच्या रक्षणासाठी त्यांच्या बंधू सिंधुदुर्ग।।। महाराजांनी गढ पाहिल्यावर हिरोंजीना विचारलं हिरोजी काय बक्षीस देऊ त्यावर हिरोजी म्हणाले महाराज काही नको मला।।। त्यावर महाराज खूप आश्चर्य चकित झाले आणि म्हणाले असं कसं हिरोजी तुम्हाला काही तरी घ्यावाच लागेल त्यावर हिरोजी हसत म्हणाले मी वेळ आल्यावर मागल तुमान्सी आणि तस वाटलं तर स्वराज्याच्या राजधानीच काम मलाच द्या ।।।। 
महाराजांचा एक नियम होता सूर्य मावळला की गढाचे दरवाजे बंद होयचे एकदा असाच प्रसंग आला हिरकणी वरती रायगढावर ।। दूध घेऊन राजांना देण्यात तिला उशीर झाला आणि गंधाचे दरवाजे बंद झाले। माघारी जाताना तिला द्वारपालाने अडवले आणि सांगितले तुला जायला नाही येणार महाराजांनी सांगितलंय कुणाला बी नाय सोडायच।।। त्या नंतर हिरकणी कश्या प्रकारे गढ उतरून पायउतार झाली हेय कुणालाच उमजत न्हवत ह्यावर महाराजांनी हिरोजींनी बोलावून घेतलं आणि विचारलं हिरोजी तुम्ही बोलला होतात ना की रात्र झाल्यावर हवा सुद्धा बाहेर जाणार नाही गढाच्या मग हिरकणी काशी पायउतार झाली? ह्या वर हिरोजी खूप गोंधळून गेले आणि म्हणले महाराज स्वराजतली आई हाय ती तिच्या लेकरा साठी कुठून पण जायल ती।।। ह्यावर महाराजांनी स्मित हास्य केल हिरकणीचा गौरव हिरोजींच्या हस्ते केला।। त्याच रात्री हिरोजींनी हिरकाणीचा दगड तासून काढला आणि महाराजांना सांगितलं महाराज आता कुणीही नाही जाऊ शकणार।।। ह्यावर महाराजांनी त्यांना विचारल काही हवय का तुम्हाला तर हिरोजींनी मान नाही म्हणून डोलवत बोलले महाराज अजून वेळ आलेली नाही तुमच्या राज्याभिषेका वेळी मी तुम्हाला मागून घेईन।। 
शिव राजयभिषेक जवळ येत होता आणि ती सुवर्ण घटका अली आणि माझा राजा खऱ्या अर्थाने रयतेचा राज जाहला। समारंभ होत असताना महाराज मावळ्यांना बक्षीस देत होते हिरोजी एका कोपऱ्यात उभे असताना महाराज त्यांना बोलले हिरोजी आज तुम्ही आम्हाला काही तरी मागणार होता त्यावर हिरोजी बोलले व्हय आज मी तुमच्या कडून एक गोष्ठ मागणार हाय आणि त्यांनी एक पाषाण काढला आणि बोलले महाराज हा पाषाण मला रायगडावर पायरी म्हणून लाऊद्यात त्यावर महाराज बोलले काय लिहिलं आहे त्या पाषाणावर?? हिरोजि हसले म्हंटले "सदैव सेवेशी तत्पर हिरोजी इंदोलकर"।।। 
आमच्या स्वराज्याचे रक्षण आणि मूलभूत स्वत्रांतता आशा माणसाच्या हातात होती म्हणून स्वराज्य घडले आणि घडवता आले।।। 
आज पर्यंत सेवेच्या 3 पायऱ्या आहेत त्यातल्या 2 आहेत माझ्या पंढरीत चोखोबांची आणि नामदेवांची आणि तिसरी सेवेची पायरी आहे माझ्या स्वराज्यातल्या खऱ्या भक्ताची हिरोजींची रायगडावर।।। 
आज पर्यंत जो कोणी रायगडावर गेला त्याने ह्या पायरीचे दर्शन नक्की घ्यावे।।। इतिहास जाणावा आणि समजून घ्यावा हेच आमचे उद्धिष्ट।।।
।।।।हिरोजी इंदलकर ह्यांच मानाचा आणि मनाचा मुजरा।।। 
           ।।। जय भवानी जय शिवाजी।।। 

||| स्वराज्य भक्ती- हिरोजी इंदलकर |||

जिजाऊंच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या, आई भवानीच्या आशीर्वादाने आणि सह्याद्रीच्या हिरव्या रांगोळीने नटलेल्या अश्या ह्या  माझ्या महाराष्ट्राल...