छत्रपतींनी स्थापित केलेल्या रयतेच्या राज्याचे पहिले सेनापती.
छ्त्रपति शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून जगाच्या इतिहासात एक तेजस्वी पर्व निर्माण केले, रयतेच्या या राजाने असामान्य साहसाचे, ऊत्कट देशभक्तीचे एक असामान्य उदाहरण अख्या जगासमोर ठेवले.. त्यांचे हे कार्य अतुलनिय आहे.
छ्त्रपति शिवरायांच्या स्वराज्य कार्यात प्रारंभी सहभागी झालेले बाजीपासलकर हे स्वराज्याचे पहिले सेनापती होते. शहाजी महाराजांचे विश्वासू असे हे बाजी छत्रपतींच्या पहिल्या रणधुमाळीचे साक्षीदार.. ह्या पराक्रमी पुरूषाचा इतिहास प्रेरणादायी असाच आहे.
मोसे खोयातील मोसे बु. गावाचे हे भुमिपुत्र ‘यशवंतराव’ किताबाने कीर्तीवंत झालेले होते. ८४ मोसे खोऱ्यातील हे वतानदार गोर-गरीबांचे आधार होते. गावा गावा तील तंटे सोडविण्यात हातखंडा असणारे, रोहिड खोऱ्यात आणि गुंजन मावळात त्यांच्या सज्जनतेची आणि दिलदारपणाची ख्याती होती..
छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेस सुरवात केली होती. शहाजीराजेंना पुणे जहागीर मिळाली होती. जिजाऊ आईसाहेब व शहाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवबांनी मावळातील एक-एक किल्ला काबीज करावयास सुरवात केली. तोरणा, शुभानमंगळ, रोहिडा असे किल्ले त्यांनी काबीज केले. विजापूरच्या आदिलशाही दरबारात शिवबांच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी येऊ लागल्या. शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशाने सन १६४८ साली फत्तेखानास धाडले. त्याचा प्रतिकार करण्या साठी छत्रपतींनी बाजी, कान्होजी जेधे आणि कावजी मल्हार ह्यांना पाठविले. लढाईच शिंग वाजवत तलवारिंच्या फेरी झाल्या आणि हर हर महादेव च्या घोषणा देत एकच रणकल्लोळ उडाला, बाजी आणि प्रत्येक मावळ्याने आपल्या शौर्याची परिसीमा गाठली होती इतक्यात एक घाव बाजींच्या पाठून त्यांच्या फिरंग समशेरधारी उजव्या हातावर झाला.वेदनेने कळवळलेले बाजी त्या भ्याडाचा प्रतिकार करण्यासाठी त्याही परिस्थितीत वळले आणि तोच क्षण साधत गनिमाची तलवार त्यांच्या छातीवर उतरली पासष्ठ वर्षांचा तरणाबांड योध्दा जमिनीवर कोसळला बाजी पडले ! आस होऊनही बाकी मावळयानी कत्तल ही सुरूच ठेवली कुठून येत असावी ही निष्ठा आणि प्रेम..
आपल्याला मागे वळण्याची इतिकर्तव्यता झाली हे लक्षात येताच फत्तेखान आपल्या सैन्यासह परत वळून पळून जाऊ लागला हे कावजी मल्हारला समजताच तो तीरासारखा खानाच्या मागे धावला. आपले सरनोबत खाली पडलेले पाहून मावळ्यांनी त्यांचं अर्धमेलेले शरीर बाजींच्या यशवंती नावाच्या घोडीवर ठेवलं, आपल्या धन्याचं जखमी शरीर पाठीवर लादून वाहून नेणारी बाजींची यशवंती आणि फत्तेखानाच्या मागे आक्रोशाने पाळणारा कावजी मल्हार यांच्या दु:खाची जात कदाचित एकच असावी ! तिकडे पुरंदर वर राज्यांच्या मनाला धाकधूक लागून राहून होती आणि इकडे यशवंतीला ... बाजींनी मात्र शरीरात उरलेली प्राण वात फक्त आपल्या विजयी राजाला – शिवरायांना पहाण्यासाठी व दोन अखेरचे शब्द बोलण्यासाठी शिल्लक ठेवली होती. गडाच्या पायथ्यापासून बाजींची पालखी वर आली आणि वाट चुकलेलं कोकरू आपल्या आईला-गोमातेला बघताच धावत सुटतं तसे राजे पालखीकडे धावले ! पालखी उतरून त्यांनी बाजींचं जखमांनी छिन्नविच्छिन्न झालेलं शरीर तोललं आणि त्यांची मान आपल्या मांडीवर घेत टाहो फोडला,”बाजी,आम्हाला असं पोरकं करुन कुठे चाललात?
राजांचे अश्रू बाजींच्या जखमांवर पडले.खारट अश्रूंनी जखमा चुरचुरल्या पण आपलं बलिदान जणू राजाने अभिषेकाने पावन केलं या जाणिवेनं मरणाच्या दारात असलेल्या बाजींच्या गलमिश्या थरथरल्या! क्षीण पण करारी आवाजात ते बोलले,”आरं मांज्या राजा,तुला भेटलो,औक्षाचं सोनं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापित केलेल्या रयतेच्या राज्याचे पहिले सेनापती.
छ्त्रपति शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून जगाच्या इतिहासात एक तेजस्वी पर्व निर्माण केले, रयतेच्या या राजाने असामान्य साहसाचे, ऊत्कट देशभक्तीचे एक असामान्य उदाहरण अख्या जगासमोर ठेवले.. त्यांचे हे कार्य अतुलनिय आहे.
छ्त्रपति शिवरायांच्या स्वराज्य कार्यात प्रारंभी सहभागी झालेले बाजीपासलकर हे स्वराज्याचे पहिले सेनापती होते. शहाजी महाराजांचे विश्वासू असे हे बाजी छत्रपतींच्या पहिल्या रणधुमाळीचे साक्षीदार.. ह्या पराक्रमी पुरूषाचा इतिहास प्रेरणादायी असाच आहे.
मोसे खोयातील मोसे बु. गावाचे हे भुमिपुत्र ‘यशवंतराव’ किताबाने कीर्तीवंत झालेले होते. ८४ मोसे खोऱ्यातील हे वतानदार गोर-गरीबांचे आधार होते. गावा गावा तील तंटे सोडविण्यात हातखंडा असणारे, रोहिड खोऱ्यात आणि गुंजन मावळात त्यांच्या सज्जनतेची आणि दिलदारपणाची ख्याती होती..
छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेस सुरवात केली होती. शहाजीराजेंना पुणे जहागीर मिळाली होती. जिजाऊ आईसाहेब व शहाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवबांनी मावळातील एक-एक किल्ला काबीज करावयास सुरवात केली. तोरणा, शुभानमंगळ, रोहिडा असे किल्ले त्यांनी काबीज केले. विजापूरच्या आदिलशाही दरबारात शिवबांच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी येऊ लागल्या. शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशाने सन १६४८ साली फत्तेखानास धाडले. त्याचा प्रतिकार करण्या साठी छत्रपतींनी बाजी, कान्होजी जेधे आणि कावजी मल्हार ह्यांना पाठविले. लढाईच शिंग वाजवत तलवारिंच्या फेरी झाल्या आणि हर हर महादेव च्या घोषणा देत एकच रणकल्लोळ उडाला, बाजी आणि प्रत्येक मावळ्याने आपल्या शौर्याची परिसीमा गाठली होती इतक्यात एक घाव बाजींच्या पाठून त्यांच्या फिरंग समशेरधारी उजव्या हातावर झाला.वेदनेने कळवळलेले बाजी त्या भ्याडाचा प्रतिकार करण्यासाठी त्याही परिस्थितीत वळले आणि तोच क्षण साधत गनिमाची तलवार त्यांच्या छातीवर उतरली पासष्ठ वर्षांचा तरणाबांड योध्दा जमिनीवर कोसळला बाजी पडले ! आस होऊनही बाकी मावळयानी कत्तल ही सुरूच ठेवली कुठून येत असावी ही निष्ठा आणि प्रेम..
आपल्याला मागे वळण्याची इतिकर्तव्यता झाली हे लक्षात येताच फत्तेखान आपल्या सैन्यासह परत वळून पळून जाऊ लागला हे कावजी मल्हारला समजताच तो तीरासारखा खानाच्या मागे धावला. आपले सरनोबत खाली पडलेले पाहून मावळ्यांनी त्यांचं अर्धमेलेले शरीर बाजींच्या यशवंती नावाच्या घोडीवर ठेवलं, आपल्या धन्याचं जखमी शरीर पाठीवर लादून वाहून नेणारी बाजींची यशवंती आणि फत्तेखानाच्या मागे आक्रोशाने पाळणारा कावजी मल्हार यांच्या दु:खाची जात कदाचित एकच असावी ! तिकडे पुरंदर वर राज्यांच्या मनाला धाकधूक लागून राहून होती आणि इकडे यशवंतीला ... बाजींनी मात्र शरीरात उरलेली प्राण वात फक्त आपल्या विजयी राजाला – शिवरायांना पहाण्यासाठी व दोन अखेरचे शब्द बोलण्यासाठी शिल्लक ठेवली होती. गडाच्या पायथ्यापासून बाजींची पालखी वर आली आणि वाट चुकलेलं कोकरू आपल्या आईला-गोमातेला बघताच धावत सुटतं तसे राजे पालखीकडे धावले ! पालखी उतरून त्यांनी बाजींचं जखमांनी छिन्नविच्छिन्न झालेलं शरीर तोललं आणि त्यांची मान आपल्या मांडीवर घेत टाहो फोडला,”बाजी,आम्हाला असं पोरकं करुन कुठे चाललात?
राजांचे अश्रू बाजींच्या जखमांवर पडले.खारट अश्रूंनी जखमा चुरचुरल्या पण आपलं बलिदान जणू राजाने अभिषेकाने पावन केलं या जाणिवेनं मरणाच्या दारात असलेल्या बाजींच्या गलमिश्या थरथरल्या! क्षीण पण करारी आवाजात ते बोलले,” आरं मांज्या राजा,तुला भेटलो,औक्षाचं सोनं जालं रं मांज्या ल्येकरा ! मला ल्योक न्हाई पर मरताना तुंजी मांडी गावली.त्या फत्याचं मुंडकं आननार व्हतो रं , पर डांव चुकला आन् त्यो पळाला.थोरल्या रांजास्नी पकडून नेणार्या त्या नामर्द बाजी घोरपड्याला नागवनार व्हतो पर त्ये बी र्हाईलं ! पर तू नगं चिंता करू!, ह्यो मांजा नातू सर्जेराव बाजी जेधे आन् त्येचा बा कान्होजी जेधे हाईती तुंज्या सांगाती.येक डाव माफी कर राजा, म्होरला जलम घिऊन यी न पुन्यांदा सवराज्यासाटी लडाया!तुज्यासाटी द्याया येकलाच जीव गावला ह्ये वंगाळ बंग ! म्या चाललू रांजा, आपलं सवताचं सवराज्य व्हनार, जय काळकाई !…..”
राजांच्या मांडीवर प्राण सोडलेल्या बाजींचे डोळे उघडेच होते, ते शिवबांनी मिटले आणि दाबून ठेवलेल्या हुंदक्यांना वाट करून दिली आणि स्वराज्याची पहिली आहुती वीर बाजी पासलकर ह्या हुतात्म्याच्या नावाने पावन झाली ।।
ज्या कान्होजी जेधेंसमोर हे सगळे घडलं त्यांना कुठेच काही कारण द्यायला जागा न्हवती की मी स्वराज्य साठी काही करायचं नाही आणि म्हणूनच बारा मावळ प्रांत कान्होजी जेधे ह्यांनी भविष्यात पावन केला आणि अवघ्या वतनावर पाणी सोडले।।
प्राणाची बाजी लावणारे बाजी पासलकर शूर वीर होते. स्वराज्यासाठी ते जगले. गेले. अजरामर झाले. त्यांचा पराक्राम कुठल्या जाती साठी धर्मा साठी न्हवता तो होता फक्त तेजस्वी फडकणार्या भागव्याच्या मानासाठी..
जगले मातीसाठी मेले मातीसाठी.… आता तरी उठा आणि जागे व्हा आपले पूर्वज चारशे वर्ष्या पूर्वी दिल्ली काबिज करायला निघाले होते आणि आपण बसलोय जातीच्या वारुळात मुंग्या बनून..
।।। जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ ।।।
No comments:
Post a Comment